कविता - पंढरीत विटेवरी

कविता - पंढरीत विटेवरी

 कविता- पंढरीत विटेवरी 




आभाळ अंधारे झाका

प्रसंग असू दे बाका


पंढरीत विटेवरी

उभा माझा पाठीराखा


संकटाचे धोंडे फेका

दुर्भाग्य धरू दे ठेका


पंढरीत विटेवरी

उभा माझा पाठीराखा


दुःखाला घेऊ दे झोका

अन्याय मारू दे मेखा


पंढरीत विटेवरी

उभा माझा पाठीराखा


विशुद्ध प्रेमाचा साका

असा नाही तिन्ही लोका


पंढरीत विटेवरी

उभा माझा पाठीराखा




© डॉ सतीश सदाशिव पवार 8108751520

कणकवली

24 dec 2018

0 Comments: