एलपीजी गॅस सिलेंडरच्या गोदामालाच भीषण आग,आजुबाजुचा परिसर हादरला
लोकसत्यवाणी न्युज : प्रविण बेटकर
मोबा.-९५९४४०१९२२
वर्सोवा (मुंबई)
मुंबईमधील वर्सोवा येथे एलपीजी गॅस सिलेंडरच्या गोदामालाच भीषण आग लागल्याने एकामागोमाग होणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडर स्फोटाच्या आवाजाने आजुबाजुचा परिसर हादरला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही परंतु चार लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली.ही आग शॉप सर्किटमुळे लागली असून गोदामात गॅस सिलेंडर असल्याकारणाने काही क्षणातच आगीचा भडका उडाला. काही काळानंतर अग्निशमन दलाला संपर्क केल्यानंतर अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोचले व जवानांनी बरीच मेहनत/ यंत्रसामुग्रीने आग आटोक्यात आणली. लागोपाठ येणाऱ्या स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक भयभीत झाले.




0 Comments: