समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर

समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर

 समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर


डोंबिवली ( शंकर जाधव ) समस्त शिंपी समाज बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यातर्फे भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांच्या सहकार्याने डोंबिवली पश्चिमेकडील एव्हरेस्ट सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.या  रक्तदान शिबीराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. मानव सेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरा  संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मिरजकरउपाध्यक्ष राजेंद्र पाखरेकार्याध्यक्ष अभिजीत माळवदे,सरचिटणीस  दिपक सातपुते, खजिनदार संतोष कल्याणकरसहकार्याध्यक्षा सुहासिनी चौहाण,गौरी जोंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील कोरोना योद्धांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या शिबिरात पोलीस मित्र,रुग्णालयातील कर्मचारी वर्ग,पोलीस अधिकारी यांचा कोरोनां योद्धा म्हणून म्हणून संस्थेच्या वतीने सन्मानपत्र,तुळशीचे रोप आणि आकर्षक वस्तू भेट म्हणून देण्यात आली.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य महिला संघटक प्रमुख जान्हवी अभिजित माळवदे यांनी केले.

0 Comments: