लॉकडाऊनमध्ये मोटारसायकली चोरणाऱ्या दोन भावांना अटक..

लॉकडाऊनमध्ये मोटारसायकली चोरणाऱ्या दोन भावांना अटक..

 लॉकडाऊनमध्ये मोटारसायकली चोरणाऱ्या दोन भावांना अटक..

                ११ दुचाकी हस्तगत



 

डोंबिवली  ( शंकर जाधव )   लॉकडाऊनमध्ये कामधंदा सुटल्यामुळे कुटुंबचा उदरनिर्वाहसाठी मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन भावांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  या दोघांजवळून पोलिसांनी ११ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण जिम ट्रेनर असून दुसरा दुकानामध्ये सेल्समनचे काम करीत होता.योगेश भानुशाली (३०),मुकेश भानुशाली (३४) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही भावंडाचे नावे आहेत. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात कुटुंबियांसह दोघे राहण्यास आहे. वडील घरोघरी जाऊन मसाले विक्री करतात तर योगेश हा जिम ट्रेनर असून मुकेश हा दुकानात सेल्समनचे काम करीत होता.

   मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या दोघांचे कामधंदा बंद झाल्यानंतर आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे या दोघांनी चिंचपाडा परिसरात राहणारा समीर उर्फ अक्रम सय्यद याच्या मदतीने कल्याण डोंबिवलीमध्ये मोटारसायकली चोरी करण्याचा धंदा सुरू केला. जून महिन्यापासून या तिघांनी मिळून सुमारे डझनभर मोटारसायकली चोरी करून एका ठिकाणी दडवून ठेवल्या होत्या. या मोटारसायकली विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. सुरेश डांबरे आणि पथक यांनी या दोन्ही मोटरसायकल चोरट्यांना अटक केली.  त्याच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी  त्याच्यांकडून  ११ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या दोघांवर या पूर्वीचे गुन्हे नसून त्याचा आणखी एक सहकारी फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुरेश डाम्बरेपोलीस अंमलदार काटकरभुंदेरेचव्हाणकिरपण आणि पथक यांनी केली.

0 Comments: