त्याने माझी कविता चोरली
काळीज जाळून, हृदया गाळून
कागदावरती तिजला कोरली
समजावून सांगा त्याला
त्याने माझी कविता चोरली
लिहिताना कविता हल्ली
अवचित वाजे कुठूनि टाळ
मधूनच वाजे मधुर बासुरी
म्हणतो कोण मजला बाळ
कशी प्रेमाने खूप सजवली
नथ, पैंजण, डोरली थोरली
समजावून सांगा त्याला
त्याने माझी कविता चोरली
भ्रम चिंतेच्या वर्षा मासी
हरिनामाची धरली इरली
सांग मला बा तू विठुराया
का माझी तू कविता चोरली
© डॉ सतीश सदाशिव पवार 8108751520
कणकवली
23 जान 2019




0 Comments: