सामाजिक संस्थांना स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनकडून पुरस्कार जाहीर
डोंबिवली ( शंकर जाधव ) स्वराज्य सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवाभावी संस्थाना पुरस्कार वितरण सत्कार समारोह आयोजित करण्यात आला आहे.रविवार २१ फेब्रेवारी दुपारी साडे तीन वाजता डोंबिवली पूर्वेकडील श्री गणेश मंदिर संस्थेच्या विनायक सभागृहात आयोजित केलेल्या या सोहळ्यात ठाणे येथील वसुंदरा संजीवनी मंडळ आणि पुणे येथील के.एच.एस.प्री प्रायमरी सेशन यांना स्वराज्य भूषण पुरस्कार २०२०, ठाणे येथील नेत्रदान प्रतिष्ठान, टिटवाळा येथील अंकुर समाजिक संस्था, डोंबिवलीतील मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट,इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली,उल्हासनगर येथील समता एज्यूकेशन ट्रस्ट,कांदिवली येथील विद्यार्थी मित्र फाउंडेशन यांना उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार २०२० तर अंधेरी येथील सुहास कुलकर्णी आणि डोंबिवलीतील तुषार गांगुर्डे यांना स्वराज्य शिलेदार पुरस्कार २०२० आणि नागपूर येथील मुकेश तुले,आशिष टेंभरे,आणि एरोली येथील किंग्स ४८४८,मुंबईतील मेयर ऑर्गनायझ फार्मा डीविजन व महापे येथील एस.जी.फार्मा यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रविंद्र चव्हाण, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,माजी नगरसेवक राहुल दामले,भाजयुमो डोंबिवली अध्यक्ष मितेश पेणकर, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजीव बिडवाडकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




0 Comments: