दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

 दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती


पत्रकार प्रविण बेटकर

मोबा.- ९५९४४०१९२२

भायखला दगडी चाळ येथील रहिवासी अखिल भारतीय सेनेचे माजी नगरसेवक मान.सुनीलभाऊ सदाशिव घाटे यांच्या पत्नी स्व.सौ.श्वेताताई (विजया) सुनील घाटे यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. लाडक्या ताई काळाच्या पडद्याआड झाल्या खर्‍या पण संपूर्ण महाराष्ट्रावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. कारण ताईची प्रचिती ही शब्दांत मावण्याएवढी सोपी नाही, ताईंच्या घरी गेलेला व्यक्ती कधीच खाली हात आलेला नाही मग तो श्रीमंत असो वा गरीब.! ताई प्रत्येकाचा तेवढाच प्रेमाने आदर करीत असे. आणि आज ताईचं प्रेम भेटलेला प्रत्येक माणसाला पोरका झालेला भास होतोय. आम्ही सर्व आप्तेष्ट मित्रपरिवार यामध्ये सामील आहोत अश्या लाडक्या ताईला भावपूर्ण आदरांजली नि श्रद्धांजली. प्रत्येक क्षेत्रात आवड असलेल्या ताईंच्या आत्मशांती प्रित्यर्थ सुनीलभाऊ यांनी कीर्तनकार व हरी ओम भजन मंडळ जय शंभू नारायण यांच्या माध्यमातून मधुर निनादातून त्या ईश्वर चरणी विलीन होवोत अशी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली.

महाराष्ट्राची राजधानी म्हणजे मुंबई आणि मुंबईत दगडी चाळ म्हटलं की भल्याभल्यांची बोलती बंद होत असते अस का? कारण येथे राहणाऱ्या प्रत्येक रहिवाश्याच्या रक्तामध्ये आहे ते महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि त्यांचे विचार. इथे अन्याय,अत्याचार, फसवणूक,पिळवणूक सहन केली जात नाही तर त्याला जागीच वाचा फोडली जाते आणि म्हणूनच दगडी चाळ म्हणजे महाराष्ट्रातील गोर-गरिबांचा सुरक्षा कवच आहे हे सिद्ध होत.जरी का त्या सुरक्षा कवचाला काळाचा धक्का लागला असला तरी ते आम्हावरी सर्वात मोठं संकट आहेच पण सुनीलभाऊनी खचून न जाता किंवा न दगमळता आम्हा लेकरांना ताईची माया नि सावली द्यावी आणि ईश्वर आपल्याला साथ देवो हीच वंदनीय प्रार्थना.

0 Comments: