LIC च्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा जॉईंटचा फ्रंटचा निर्णय.

LIC च्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा जॉईंटचा फ्रंटचा निर्णय.

 


विमा कर्मचारी बंधू आणि भगिनींनो १ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर झालेल्या बजेट नुसार सरकारने LIC मधील सरकारी हिस्सा काही प्रमाणात IPO द्वारे विकण्याचे म्हणजेच निर्गुंतवणूकरण ( Disinvestment) करण्याचे जाहीर केले आहे.तसेच FDI वाढवून 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांवर करण्यात आली आहे. सदर निर्णय देशहिताच्या विरोधी व विमा धारकांचे नुकसान करणारा असल्याने LIC च्या संरक्षणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा जॉईंटचा फ्रंटचा निर्णय. त्यानुसार सोमवार दिनांक ८.२.२०२१ दुपारी १.३०वाजता LUNCH HOURS मध्ये योगक्षेम प्रवेशद्वार इथे निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तरी मुंबईतील सर्व विमा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील होऊन प्रखर निषेध नोंदवावा. ही नम्र विनंती

AIIEA झिंदाबाद!

जॉईंट फ्रंट झिंदाबाद!

कामगार एकता झिंदाबाद!


*कॉ जयदेव मिठबावकर

अध्यक्ष

कॉम अभय मोरे.            ... ..सरचिटणीस.        विमा कामगार संघटना विभाग ४

0 Comments: