बेधुंद होऊन बारबालासोबत पोलीस कर्मचाऱ्याचा नृत्याविष्कार; व्हिडीओ व्हायरल..

बेधुंद होऊन बारबालासोबत पोलीस कर्मचाऱ्याचा नृत्याविष्कार; व्हिडीओ व्हायरल..

 बेधुंद होऊन बारबालासोबत पोलीस कर्मचाऱ्याचा नृत्याविष्कार; व्हिडीओ व्हायरल.. 


प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)


एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने सर्वचच शासकीय यंत्रणा सज्ज होऊन आपआपल्या परीने महाभयंकर कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यातच उल्हासनगर पोलीस परिमंडळच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत मात्र कायदा व नियम धाब्यावर बसवुन ऑर्केष्ट्राच्या नावाखाली  डान्सबारमध्ये छमछम सुरु असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस कर्मचारीच छमछम बार मधील नृत्यावर एका बारबालासोबत  बेधुंद होऊन आपल्या नृत्य कलाविष्कार सादर केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वैजनाथ राख असे  पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. 


 'छमछम'ला कोणाचा आर्शिवाद ?..  


विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या डान्सबार विरोधात अनेक संघटना व समाजसेवकांनी तक्रारी करुनही या डान्सबारवर पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप होत असतानाच, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील भारत पेट्रोलियम समोरील "राखी बार" मध्ये ऑर्केष्ट्राच्या नावाखाली  छमछम रात्री उशिरापर्यत सुरु असते. याच बारमध्ये  वैजनाथ राख हा पोलीस कर्मचारी जेव्हा एका बारबाला बरोबर बेधुंद होऊन तिचा हात हातात घेऊन तिला गोल फिरवत "जब में आई सुहागवाली रात में उसने चुमेशी किया सुरुवात रे" व "आई लव यु प्यार करु छु" या गाण्यावर नृत्य सादर करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे  विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कोणाच्या आशिर्वादाने हा डान्सबार सुरु आहेत याचा छडा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लावल्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.


0 Comments: