केडीएमसी हद्दीत पहिल्या दिवसी ७४ ज्येष्ठ नागरिकांना टोचली कोरोना लस
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोविड-१९ लसीकरण सत्रास १ मार्च २०२१ पासून सुरुवात झाली.कल्याण येथील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय येथे लसीकरण सुरु आहे.पहिल्या दिवसी ७४ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती पालिकेचे डॉ.निंबाळकर यांनी दिली.मात्र दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी सकाळपासून संकेतस्थळातील त्रुटीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना नावनोंदणी करणे शक्य झाले नाही.परिणामी केंद्रात लस टोचण्याचे काम संथ गतीने सुरु होते.लस टोचण्यासाठी आवश्यक नोंदणी न करताच काही ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रात येत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणीची प्रक्रिया समजाविण्यात आली.याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहासिनी बडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, लस टोचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसर्या दिवशी शास्त्रीनगर रुग्णालयात दुपारी ४ वाजेपर्यत ६५ ज्येष्ठ नागरिकांनि लस टोचून घेतली.Cowin.gov.in या संकेतस्





0 Comments: