डोंबिवलीत महिलेची हत्या...
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात ३० वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना रविवारी रात्रीच्या वेळी घडली.श्वेता गुप्ता असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.या हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुड्डीकुमार याला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,श्वेता गुप्ता व तिचे पती राजेश गुप्ता यांचे लोढा हेवन परिसरात भवानी चौकात भाडेतत्वावर रेशनिंगचे दुकान घेतले होते.रविवारी रात्रीच्या वेळी श्वेता गुप्ता, तिचे पती राजेश गुप्ता आणि कामगार गुड्डीकुमार हे तिघे दारू पीत बसले होते.काही वेळाने राजेश गुप्ता हे सदर ठिकाणाहून निघून गेले.काही वेळाने ते परत आल्यावर श्वेता गुप्ता ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तर समोरच गुड्डीकुमार यांच्या अंगावर रक्त दिसले.पती राजेश यांनी याबाबत गुड्डीकुमार याला विचारले असता श्वेता गुप्ता ह्यांनी स्वतःलाच जखमी करून घेतल्याचे सांगितले. मात्र श्वेता गुप्ता यांनी स्वतःला जखमी केले असते तर गुड्डीकुमार याच्या अंगावर रक्त कसे ? असा संशय पोलिसांना आला. सुरुवातीला खोटे बोलणारा गुड्डीकुमार याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने महिलेची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.परंतु या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.या प्रकरणी पुढील तपास मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वानवे यांनी करत आहेत.




0 Comments: