चर्मकार आघाडी, उद्योग आघाडी, मुस्लिम आघाडीची पदे रद्द झाल्याचे अंकुश गायकवाडांकडून जाहीर
डोंबिवली ( शंकर जाधव )नुकतेच डोंबिवलीत चर्मकार आघाडी, उद्योग आघाडी, मुस्लिम आघाडीची जी पदे देण्यात आली होती ही सर्व पदे देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केला आहे त्यामुळे ही सर्व पदे रद्द करण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यापुढे कोणतीही नियुक्ती डोंबिवली शहरात करायची झाल्यास डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांना विश्वासात न घेता करण्यात आल्या तर ती पदे ग्राह्य धरण्यात येणार नाही अशी माहिती शहर सचिव दिनेश साळवे यांनी दिली. माणिक उघडे यांचे शहर कार्याध्यक्ष हे पद कायम असल्याचेहि अंकुश गायकवाड यांनी नमूद केले. याबाबत पक्षाचे निरीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.




0 Comments: